पहिल्या भागात काही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना पैसे मिळतील. यात नांदेड, संभाजीनगर, जालना, लातूर, ठाणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, उस्मानाबाद, गोंदिया, अकोला, अमरावती, अहमदनगर आणि चंद्रपूर या १८ जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे दुपारी ३ वाजेपर्यंत येतील. बाकी उरलेल्या जिल्ह्यांमध्ये पुढील ४ ते ५ दिवसांमध्ये पैसे जमा होतील. पैसे जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांना SMS येईल.