मार्च चा हफ्ता या दिवशी होणार खात्यात जमा

जागतिक महिलादिनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’अंतर्गत फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यांचे अनुदान हस्तांतरित केले जाईल, असे महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केले होते. पण महिलादिनी अडीच कोटी महिलांच्या खात्यात फेब्रुवारीचे अनुदान हस्तांतरित करण्यात आले. येत्या दोन दिवसांत मार्चचे अनुदान हस्तांतरित करण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात अडीच कोटी लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा लाभ थेट बँकेत जमा करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. फेब्रुवारीच्या लाभाची रक्कम हस्तांतरित झाल्यानंतर मार्चच्या लाभाची रक्कम हस्तांतरित केली जाईल, असे सांगणयात आले. काही तांत्रिक अडचणींमुळे दोन महिन्यांचे अनुदान एकदम हस्तांतरित करता आले नाही.