लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते एकत्र मिळणार?

लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते एकत्र मिळणार?

राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  15 फेब्रुवारीला परभणीतील एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 3490 कोटी रुपयांच्या चेकवर सही केल्याचं सांगितलं होतं. त्याच भाषणात अजित पवार यांनी पुढच्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळतील, असं म्हटलं होतं. मात्र, संपूर्ण फेब्रुवारी महिना संपल्यानंतर देखील लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळाले नाहीत. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरु असल्यानं मिळाली नसल्याची माहिती आहे. त्यामुळं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते एकाच वेळी मिळू शकतात. म्हणजेच मार्च महिन्यात लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचे 3000 रुपये मिळू शकतात.

ज्या लाडक्या बहिणींचा मागील हफ्ता मिळाला नाही आशा त्या लाडक्या बहिणींना एकूण चार हजार पाचशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे.