Ladki Bahin Yojna hafta लाडक्या बहिणींना मार्च महिन्यात “या” दिवशी 3000 रुपये मिळणार, अदिती तटकरेंची घोषणा

Ladki Bahin Yojna hafta : महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे.

Ladki Bahin Yojna hafta: लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट मिळणार आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे. आदिती तटकरे यांनी ही घोषणा केली आहे. 7 मार्च 2025 पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा सन्मान निधी 3000 रुपये जमा करण्यात येईल अशी माहिती आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.

“या” दिवशी 3000 रुपये मिळणार

 

अदिती तटकरेंची घोषणा

लाडकी योजनेच्या 83% लाभार्थी विवाहित महिला Ladki Bahin Yojna hafta 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या सुमारे 2.5 कोटी लाभार्थ्यांमध्ये जवळपास 83% लाभार्थी विवाहित महिला आहेत. अविवाहित महिला लाभार्थ्यांपैकी 11.8% आहेत तर विधवांचा वाटा 4.7% आहे. घटस्फोटित, निराधार आणि सोडून दिलेल्या महिला एकत्रितपणे 1% पेक्षा कमी लाभार्थ्यांचे आहेत, असे आकडेवारीवरून दिसून येते. घटस्फोटित महिला एकूण लाभार्थ्यांपैकी 0.3%, सोडून दिलेल्या महिला 0.2% आणि निराधार महिला 0.1% आहेत. 30 ते 39 वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे एकूण लाभार्थ्यांपैकी 29% होती. त्यानंतर 21-29 वयोगटातील गट 25.5% होता तर 40-49 वयोगटातील गट लाभार्थ्यांपैकी 23.6% होता. खरंच, 78% लाभार्थी 21-39 वयोगटातील होते आणि 22% लाभार्थी 50-65 वयोगटातील होते. 60-65 वयोगटातील लाभार्थींचा वाटा जवळजवळ 5% होता. “60-65 वयोगटातील जवळजवळ 5% महिलांना लाभ मिळाला आहे.Ladki Bahin Yojna hafta

विरोधकांना सुरुवातीपासून ही योजना खुपते आहे. विरोधकांना त्यामुळे नैराश्य  आलं आहे. फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता आहे, मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. त्यात शेवटाला आपण तो हफ्ता देऊ, असे अदिती तटकरे म्हणाल्या. यासंदर्भातली यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न असेल. प्रत्येक जिल्ह्यात महिलांनी एकत्र येत आर्थिक सक्षम व्हावं, असे त्या म्हणाल्या.

रायगडसंदर्भातली परंपरा खंडीत होणार नाही. रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत लवकरच निर्णय घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  Ladki Bahin Yojna hafta

रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणात पोलीस तपास करत आहेत. यात कारवाईदेखील करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात कारवाईचं आश्वासन दिलेलं असल्याचे अदिती तटकरे म्हणाल्या. लाडकी बहिण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता महिलांना 8 मार्च रोजी मिळणार आहे. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहिण योजनेचा हफ्ता दिला जाणार आहे.  मार्च महिन्याचा हफ्ता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटाला मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment